Download File
जिमखाना अहवाल - सन २०२२- –२३
शैक्षणिक वर्षं २०२२– २३- या वर्षात आपल्या महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. या वर्षात एकूण ७ खेळाडूंनी आंतर-विद्यापीठ व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला व ५ खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केले.
या वर्षात वरिष्ठ महाविद्यालयातील सुजित काशीद याने चंदिगड येथे झालेल्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल व दीपक पडाळे याने गुवाहाटी येथे झालेल्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल. प्रज्वल ढाकणे याने गुवाहाटी येथे राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. दुर्गा आव्हाड व वैष्णवी कासार यांनी गुवाहाटी येथे आखिल भारतीय आंतर-विद्यापीठ बेसबॉल स्पर्धेत कास्य पदक मिळवले.
या वर्षात मुलांच्या ११ संघ व मुलींच्या ०६ संघानी एकून १७ आंतर- महाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी झाले होते यात ०३ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद व ०२ स्पर्धेत उप-विजेतेपद मिळवले. यात मुलीच्या बेसबॉल, बँडमिटन संघाने सलग सातव्या वर्षी विजेतेपद मिळवले व मुलांच्या बेसबॉल संघाने सलग चौथ्या वर्षी आंतर- महाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपद मिळवले. तर मुलीच्या साँफटबॉल, बँडमिटन, क्रीकेट व मुलांच्या बेसबॉल संघाने विजेतेपद मिळविले. या वर्षात ४४ खेळांडूची निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजीत अहमदनगर विभागीय पातळीवर निवड झाली.
के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव यांनी आज २१ जून २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन खेळ व शारीरिक शिक्षण विभाग, N.C.C. व N.S.S. या तिन्ही विभागांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे खेळाडू, N.C.C. छात्र सैनिक व N.S.S. विद्यार्थी असे एकूण १३७ विद्यार्थी व ४५ शिक्षक सहभागी झाले. या कार्यक्रमाची सुरवात सकाळी ७:३० ला झाली होती यात योगाचा परिचय करून देण्यात आला. महाविद्यालयाचा योगाचा राष्ट्रीय खेळाडू प्रज्वल ढाकणे यांनी योगाची प्रात्यक्षिक करून दाखवली.
या वर्षात महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय व्हॉलीबॉल (मुले) स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धात पुणे शहर, पुणे ग्रामीण, नशिक व अहमदनगर अशा चार संघांनी सहभाग घेतला. दिवस व रात्र अशा रीतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा २ दिवस चालू होत्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय सॉफ्टबॉल (मुली) स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धात पुणे शहर, पुणे ग्रामीण, नशिक व अहमदनगर अशा चार संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धा २ दिवस चालू होत्या. अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल (मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते.
०७ डिसेंबर रोजी संस्थेचे संस्थापक माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १०व ११ डिसेंबर रोजी मुले व मुलीसाठी दुहेरी राज्यस्तरीय बँडमिटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या मुले व मुलीना १ लाख रुपयाचे बक्षीस व चषक देण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री. आशुतोष दादा काळे, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे, सचिव मा.श्री.अँड. संजीवदादा कुलकर्णी, व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्या हस्ते झाले.
11 व 12 ऑक्टोबर 2022 रोजी विद्याविहार मुंबई येथील के. जे. सोमैया कॉलेज येथे खेळल्या गेलेल्या Athletes TOSS 2022 मध्ये आपल्या महाविद्यालयातील स्टाफने एकूण 16 पदक मिळवले. 35 ते 40 वयोगटात डॉ. सुनील कुटे यांनी एकूण 5 सुवर्ण पदक मिळवले. याच वयोगटात डॉ. वसुदेव साळुंके यांनी 2 ब्रॉन्झ व 3 रजतपदक अशी एकूण पाच पदके मिळवले. डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी 2 ब्रॉन्झ व 1 रजत असे एकूण तीन पदक मिळवले तर 35 पेक्षा लहान वयोगटात खेळतांना रोहनकुमार यादव यांनी 2 सुवर्ण व 1 रजत असे एकूण तीन पदक मिळवले.
सोमैया विद्याविहार आयोजीत आंतर महाविद्यालयीन शिक्षक व सेवक यांच्यासाठी Cricket TOSS २०२२ स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धामध्ये महाराष्ट्र, मुंबई, गुजरात व बेंगलोर येथील विविध २५ संघानी सहभाग घेतला. महाविद्यालयाचा संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेते पद मिळवले. या स्पर्धामध्ये अतिंम सामन्यात सोमैया कंपनी, बेंगलोर या संघासोबत रोमहर्षक सामन्यात पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा बहुमान मिळविला. सर्व खेळाडूंनी अतिशय सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनिल कुटे यानी चार सामन्यात Man of the Match किताब मिळवला व संपूर्ण स्पर्धामधील Best Batsman व Man of the Series चा किताब पण मिळवला.
या वर्षात माजी कै. के. बी. रोहमारे याच्या जन्मशताब्दी वर्षानिम्मित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकत्तेर कमर्चारी याच्यासाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालायतील शिक्षकसाठी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस चार संघ तयार करण्यात आले व ६० खेळाडूची चार संघामध्ये विभागणी करण्यात आली. या चार संघामध्ये लीग पद्धतीने सामने खेळविण्यात आले. अव्वल २ संघामध्ये फायनल सामना खेळविण्यात आला. रायगड किंग्स विरुद्ध शिवनेरी टायगर याच्या खेळविण्यात आला. यामध्ये शिवनेरी टायगर संघाने विजय मिळवला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षात इंटर क्लास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रस्सीखेच, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस व क्रिकेट मुले व मुली या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेट या स्पर्धेत मुलाच्या २० संघांनी तर मुलीच्या १० संघांनी सहभागी झाले. या संपूर्ण स्पर्धेत ६५१ खेळाडूंनी सहभाग घेतला. मुलाच्या क्रिकेट स्पर्धेत M.Sc विजयी तर T.Y (Chemistry) उपविजयी तर मुलीमध्ये FYBA विजयी तर S.Y.B.Cs उपविजयी झाले. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या सर्व मुले व मुलीना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आले.
या पूर्ण वर्षात हे सर्व यश प्राप्त करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्याचेही आभार तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे, सचिव मा.श्री.अँड. संजीवदादा कुलकर्णी व मा.श्री. संदीप रोहमारे यांनी वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन केले त्याचेही आभार. तसेच जिमखाना कमिटीचे अध्यक्ष डॉ. जी.एस.मोरे, डॉ. व्ही.एस.साळुंके, प्रा. एस.एस. नागरे, डॉ. व्ही.एम.खोसे व प्रा. नीता शिंदे व जिमखाना प्रतिनिधी व सर्व खेळांडूनी मोठ्या प्रमाणावर मदत केली त्याचेही आभार. तसेच जिमखाना विभागातील सर्व साहीत्य निगा राखण्याचे काम श्री. किशोर गायकवाड याने योग्य प्रकारे केले त्याचेही आभार.
डॉ. सुनिल कुटे डॉ. जे. एस .मोरे